धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या कार्यालयात OSD पदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान

परंडा(प्रतिनिधी)धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना .प्रताप सरनाईक साहेब (परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य )यांच्या कार्यालयात OSD (विशेष कार्य अधिकारी) म्हणून आमचे मित्र तसेच बावची विद्यालयाचे पालक गणेश कुकडे साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल बावची विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. गणेश कुकडे साहेब यांच्या या यशाबद्दल सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.बावची विद्यालय परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन!

error: Content is protected !!