बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परांडा येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

परंडा (प्रतिनिधी) बावची विद्यालय, परंडा तसेच वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने शेती, उद्योग, व्यापार व बँकिंग क्षेत्रातील विविध संधी व योजनांबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आज विद्यालयात आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी परंडा तालुक्याचे कृषी अधिकारी मा. श्री. नानासाहेब लांडगे, भारतीय स्टेट बँक परंडा शाखेचे मॅनेजर मा. श्री. सोमनाथ माने, MPSC द्वारे जलसंधारण विभागात निवड झालेल्या सौ. श्नद्धा टोंपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. सौदागर टोंपे, कृषी निरीक्षक श्री. संभाजी माळी, कृषी विभागाचे श्री. सिद्धेश्वर राऊत तसेच माजी मुख्याध्यापक श्री. अशोक काकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी कृषी अधिकारी श्री. लांडगे यांनी विविध शासकीय कृषी योजनांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व उपयुक्त ॲपचा वापर समजावून सांगितला. SBI चे मॅनेजर श्री. माने यांनी बँकिंग योजना, कर्जप्रक्रिया, बचत व आर्थिक साक्षरतेबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

सौ. श्नद्धा टोंपे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी ध्येय-नियोजन, अभ्यासपद्धती आणि सातत्य याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. इतर मान्यवरांनी उद्योग, व्यापार, रोजगार व तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींबाबत उपयुक्त माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण खैरे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. शुभम रोडगे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. धोंडीराम दुधे सर यांनी मानले.

विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, संधी आणि आधुनिक माहिती देणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

error: Content is protected !!