डोंजा: (प्रतिनिधी) जि.प.प्रा.शाळा गोसावीवाडी(डोंजा) येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिन बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थींचे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.त्यानंतर केक कापण्यात आला.यावेळी गावातील भालचंद्र सूरवसे, मधूकर इटुकडे,पप्पू जाधव, मनोहर इटुकडे, महादेव इटुकडे,अमर खाडे, रोहिदास सूरवसे, आण्णा कौले, सीताबाई काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित व माहिती मुख्याध्यापक श्री.अनिल गिरी यांनी सांगितले तर आभार शाळेतील शिक्षीका श्रीमती सविता गिरी यांनी मानले.