परंडा(माझं गांव माझं शहर )राष्ट्रीय एकता दिवस व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती दिनानिमित्त मा. रितु खोखर , पोलीस अधीक्षक धाराशिव व मा. शफकत आमना , अपर पोलीस अधीक्षक धाराशिव व मा. अनिल चोरमले , उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व भा. आसाराम चोरमले, पोलीस निरिक्षक पो.स्टे परंडा यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस ठाणे परंडा येथे आज दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ०६.१५ ते ०७.०० वा. पावेतो राष्ट्रीय एकता दिवस व भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त पोलीस ठाणे परंडा हददीत साजरी करण्यात आली.
यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
१. रन फॉर युनिटी :- नागरीकांमध्ये राष्ट्रीय एकता, अखंडता व देशप्रेमाची भावना दृढ करण्यासाठी पोलीस ठाणे परंडा ते छत्रपती संभाजी महाराज चौक ते परत पोलीस ठाणे परंडा येथे विसर्जन असे ३ कि.मी एकता दौंड चे आयोजन करण्यात आले होते. सदर एकता दौंड मध्ये पोलीस, होमगार्ड, पत्रकार, कमांडो करिअर अॅकॅडमीचे मुले-मुली, शहरातील फोटोग्रॉफर व सामान्य नागरीक यांनी उत्सुकतेणे सहभाग घेतला.
२. एकता शपथ विधी :- देशाच्या अखंडतेसाठी योगदान देण्याचा संकल्प म्हणुन पोलीस ठाणे परंडा येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी राष्ट्रीय एकता प्रतिज्ञा घेतली.
३.स्वच्छता उपक्रम :- पर्यावरण संवर्धनासोबतच एकतेचा संदेश देण्यासाठी पोलीस ठाणे परंडा येथील परिसर स्वच्छ करण्यात आले. सदरचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात, शिस्तबध्द व शांततेत पार पाडला.
यावेळी परंडा येथील पोलीस अधिकारी श्री आसाराम चोरमले पोलोस निरिक्षक, श्री बाबासाहेब खरात, पोलीस उपनिरिक्षक, श्री दिलीप पवार, व गजानन मुळे सहा. पोलीस उपनिरिक्षक, पोलीस हवालदार शिंदे, राउत, शेवाळे, क्षिरसागर, जगदाळे, आडसुळ, काकडे, खताळ, सगर, सय्यद, व नितिन गुंडाळे तसेच कमांडो करिअर अकॅडमीचे श्री तनपुरे मेजर, मुले-मुली, होमगार्ड, पत्रकार व फोटो ग्राफर कानिफनाथ गोरे व इतर सामान्य नागरीक असे १५० ते १७५ लोक उपस्थित होते.