जगदाळवाडी येथील गणपती मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न


परंडा (माझं गाव माझं शहर) देशाचे भवितव्य घडवणा-या युवा पिढी मध्ये एकता,बंधुता, राष्ट्रभक्ती ,सामाजिक एकता व खिलाडूवृत्ती या मूल्यांची जोपासना व्हावी म्हणून दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ह.भ.प नानासाहेब महाराज व पोलीस पाटील रावसाहेब गिरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.त्यानंतर जगदाळवाडी ,हिंगणगाव, देऊळगाव ,पारेवाडी,डोंजा काटेवाडी या सीमाभागावर असणाऱ्या गणपती मैदानात जगदाळवाडी येथील एकता प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेने खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले होते यामध्ये परिसरातील तसेच जामखेड, करमाळा, कुर्डूवाडी ,माढा या परिसरातील जवळजवळ ३० संघाने भाग घेऊन स्पर्धेतील उत्सुकता वाढवली, झालेल्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची सांगता आज झाली.या स्पर्धातेती पहिले बक्षीस रूपये ३१०००/ जवळके (सटवाई) ता.जामखेड या संघाने यांनी पटकाविले तर दूसरे बक्षीस आयोजन एकता प्रतिष्ठान जगदाळवाडी यांनी २१००० /यांनी पटकाविले,तिसरे बक्षीस रूपये १५०००/ पारेवाडी संघास मिळाले तर उत्तेजनार्थ चौथे बक्षीस इंनगोदा संघास मिळाले. एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश गिरी, कृष्णा ढवळे, उमेश गुंड, विनोद बालगुडे, राहूल कौले, मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ जगदावाडी यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

error: Content is protected !!