पुणे(माझं गांव माझं शहर)अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे शहर युवा सहसचिव पदी शुभम मुळे यांची नुकतीच निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे येथील राज्यस्तरीय राजकुमार काळभोर स्मृती राज्यस्तरीय कवी व साहित्य संमेलनात या निवडीबद्दल दिनांक. १९ ऑगस्ट रोजी महात्मा जोतिबा फुले सभागृहात शुभम मुळे यांचा सत्कार करण्यात आला. समारंभात संमेलन अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक सूर्यकांत नामुगडे, किशोर टिळेकर, महाराष्ट्र केसरी पै. राहुलकुमार काळभोर तसेच अ. भा. म. सा. प. चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, उपाध्यक्षा शुभांगी काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
शुभम मुळे यांनी गेल्या तीन वर्षात राजकीय, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने पुणे शहर युवा सहसचिव पदी त्यांची सर्वानुमते नियुक्ती केली आहे.