परंडा(प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयाचे तहसीलदार निलेश काकडे यांच्या आदेशावरून परंडा येथे महसूल दिनाचे औचित्य साधून तनवीर मशायक यांच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक पाच या दुकानात निराधार लाभार्थींचे kyc कॅम्प आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास नायब तहसीलदार सौ. गोरे मॅडम, पुरवठा पेशकार नितीन भांडवलकर, सौ. नोरबानू शेख, ज्योती चौतमहाल, रेखा काळे या महसूल कर्मचाऱ्यांसह स्वस्त धान्य दुकानदार तनवीर मशायक आणि अनेक निराधार लाभार्थी उपस्थित होते. याप्रसंगी अनेक निराधार लाभार्थ्यांनी आपले kyc अपडेट करून घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वस्त धान्य दुकान क्रमांक पाच चे तनवीर मशायक यांनी परिश्रम घेतले.