परंडा तालुक्यात ७१.६२ टक्के मतदान; मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष

परंडा – दि. ७) परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ५ गट व पंचायत समितीचे १० गणासाठी निवडणूक प्रक्रिया तुरळक घटना वगळता शांततेमध्ये पार पडली. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाचा कारभार हाकण्यासाठी जि.प. च्या ५ जागेसाठी ३० तर तालुक्याचा कारभार हसण्यासाठी प.स. च्या १० जागेसाठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यासाठी एकूण ७१.६२ टक्के मतदान झाले असून आता सोमवार दि. ९ रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

         जिल्हा परिषद शेळगाव गट क्रमांक २९ मध्ये २१ हजार ७९९ मतदानातून त्यामध्ये ७१.९ टक्के मतदान झाले अनाळा गट क्रमांक ३० मध्ये १९ हजार ५९० मतदाना असून त्यामध्ये ७१.४१ टक्के मतदान झाले. जवळा (नि.) गट क्रमांक ३१ मध्ये २१ हजार २ मतदान असून त्यामध्ये ७४.२७ टक्के मतदान झाले. डोंजा गट क्रमांक ३२ मध्ये २२ हजार ३७६ मतदान असून त्यामध्ये ६९.९९ टक्के मतदान झाले तर लोणी गट क्रमांक ३३ मध्ये २२ हजार ४८९ मतदान होते त्यामध्ये ७१.४४ टक्के मतदान झाले आहे तालुक्यामध्ये एकूण १ लाख ७ हजार २५६ मतदानापैकी ७६ हजार ८१२ इतके मतदान झाले असून एकूण ७१.६२ टक्के मतदान झाले आहे. मिनी मंत्रालयाचा कारभार हाकण्यासाठी निवडणुकीच्या फडात आता कोण बाजी मारणार याकडे आता सोमवार दि. ९ रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

error: Content is protected !!