आदर्श शाळा जिल्हा परिषद शाळा खंडेश्वरवाडी येथे शिवश्री रामभाऊ पवार यांच्या तफें शैक्षणिक साहित्य वाटप.

परंडा(तानाजी घोडके)परंडा तालुक्यातील प्राथमिक शाळा खंडेश्वरवाडी येथे शेतकरी पुत्र शिवश्री रामभाऊ पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडेश्वरवाडी मध्ये शाळेतील 1 ली ते7 वी विद्यार्थयांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
  उद्योजक रामभाऊ पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व शालेय साहित्य वाटप केल्याबदल मुख्याध्यापक सांळुखे सर यांनी आभार मानले. वाढदिवस एक शैक्षणिक चळवळ निर्माण करण्याचा मानस रामभाऊ पवार यांचा आहे .या कार्यक्रमासाठी भगवान जाधव, मधुकर जाधव, आभिराज काळे, केतन पवार .साहिल जाधव, शुभम जाधव, माउली भांडवलकर बाळासाहेब भांडवलकर सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!