परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून जाकिर भाई सौदागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

परंडा : नगर परिषदेच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज, दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी, शिवसेनेच्या वतीने जाकिर भाई सौदागर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली व आदेशानुसार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

याप्रसंगी जाकिर भाई यांच्या उमेदवारीवर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, ” जाकिर भाई यांना नगराध्यक्ष पदाचा पूर्वीचा अनुभव आहे. तो पाहता ते सहजपणे शिवसेनेचा धनुष्यबाण पेलतील. जाकिर भाई शहराचा सर्वांगीण विकास केवळ शिवसेनाच करू शकते,” असा ठाम विश्वास आमदार तानाजी सावंत व्यक्त केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने दत्ता साळुंखे, संजय घाडगे, इरफान शेख, संजय कुमार बनसोडे, वाजीत दखणी, बाळासाहेब गायकवाड, बच्चन गायकवाड, आप्पा मेहेर, दिलीप रणभोर, तनवीर मुजावर यांच्यासह इतर असंख्य शिवसैनिकांचा समावेश होता

error: Content is protected !!