तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्रामध्ये जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

धाराशिव : (विठ्ठल गायकवाड) तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, धाराशिव येथे ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील दिव्यांग घटकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने सर, प्राध्यापक निंबाळकर सर, प्रमुख पाहुणे प्रहार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष व धाराशिव जिल्हाध्यक्ष मयूरजी काकडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे धाराशिव तालुका संयोजक विठ्ठल गायकवाड, दिव्यांग प्रतिनिधी ईश्वर बनसोडे व अशोक गाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विक्रम माने सर यांनी दिव्यांगांचे हक्क, अधिकार तसेच आदरणीय आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

प्रमुख पाहुणे मयूरजी काकडे यांनी दिव्यांगांचे समाजातील स्थान, त्यांना मिळणारे सहकार्य आणि त्यांच्या सक्षमीकरणाचे महत्व याबद्दल मनोगत व्यक्त केले. दरम्यान, दिव्यांग ईश्वर बनसोडे यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवांद्वारे समाजातील दिव्यांगांसाठी वाढत चाललेल्या सकारात्मक वातावरणाची नोंद केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विठ्ठल गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक गाडे व अध्ययन केंद्रातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!