शिंदे महाविद्यालयात एड्स प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर कार्यशाळा संपन्न-डॉ आनंद मोरे

परंडा (माझं गांव माझं शहर ) परंडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने व सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा शिल्लचिकित्सक कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेसाठी उपजिल्हा रुग्णालय परांडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद मोरे, डॉ जितेंद्र होवाळ , डॉ अमोल बांबुरकर व डॉ अजय वैद्य यांची उपस्थिती होती. प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ अतुल हुंबे डॉ शहाजी चंदनशिवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले. डॉ आनंद मोरे यांनी एड्स प्रतिबंध या विषयावर तसेच शालेय शिक्षक व शिक्षिका यांचे किशोरवयीन जीवन कौशल्य या विषयावर ही अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी एक व्यापक कार्यक्रम म्हणून राबविण्यात येत आहे .एन ए सी पी आय ची अंमलबजावणी एच आय व्ही संसर्गाचा प्रसार कमी करण्याचे उद्देशाने करण्यात आली होती जेणेकरून देशातील विकृती मृत्यू आणि एड्सचा प्रभाव कमी करता येईल. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण मंडळ ची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मुख्य करुन मुलींनी आपले आजार मोकळ्या मनाने सांगून आपले आरोग्य चांगले ठेवावे .डॉ जितेंद्र ओवाळ यांनी शालेय शिक्षक व शिक्षिका यांचे किशोरवयीन जीवन कौशल्य या विषयावर आपले व्याख्यान दिले. अमोल वांबुरकर यांनी एड्स जनजागृती या विषयावर आपली व्याख्यान दिले. या कार्यशाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध रोगावर व रोगासंदर्भात चर्चा केली. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा अनंत अनभुले यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!