पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त अभिवादन करताना-मा.आ. सुजितसिंह ठाकूर

परंडा :- एकात्म मानवतावादाचे आणि अंत्योदयाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक, कुशल संघटक आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंती निमित्त भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संपर्क कार्यालय परंडा येथे प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले..!

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय राजकारणातील एक प्रमुख प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि समाजसुधारक होते, ज्यांनी “एकात्म मानवतावाद” या तत्वज्ञानाचा पुरस्कार करून समाजाला एक नवीन दिशा दिली. त्यांचे तत्वज्ञान या विश्वासावर आधारित होते की समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक गरजा संतुलित पद्धतीने पूर्ण केल्या जातात. त्यांनी नेहमीच समाजातील सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित घटकांची काळजी घेतली आणि त्यांचा उन्नती हाच खरा विकास मानला.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, सुखदेव टोंपे, ॲड. जहीर चौधरी, ता. सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, चिटणीस किरण देशमुख, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, बाबासाहेब जाधव, साहेबराव पाडुळे, डॉ. आनंद मोरे, शिवाजीराव पाटील, रामदास गुडे, रामकृष्ण घोडके, धनंजय काळे, मिलिंद शिंदे, मनोहर पवार, सिध्दीक हन्नुरे, गौरव पाटील, सुरज काळे, व्यंकटेश दिक्षित, किरण पांडे, आप्पा मदने, जयंत सायकर, योगेश डांगे, विवेक ठक्कर, सायम शेख, अक्षयप्रतापसिंह ठाकूर, जयंत भातलवंडे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!