श्री कल्याण स्वामी मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..

परंडा (प्रतिनिधी)कल्याण स्वामी हे एक महान धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक नेते होते. त्यांचा जीवनप्रवास, कार्य आणि त्यांच्या विचारधारेचे महत्त्व अजूनही अनेक लोकांच्या हृदयात जिवंत आहे. त्यांच्या पुण्यतिथीला आदरांजली वाहताना, आपण त्यांची शिकवण आणि कार्य यादवी करून त्यांना अभिवादन करू शकतो.त्यांच्या जीवनाची काही महत्त्वाची पैलू:धार्मिक कार्य: कल्याण स्वामी यांनी आपल्या जीवनात भगवद्भक्ति आणि सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.सामाजिक बदल: ते गरीब, गरजू आणि वंचित लोकांसाठी कार्यरत होते आणि समाजातील असमानतेला विरोध करत होते.आध्यात्मिक मार्गदर्शन: त्यांनी साधना आणि ध्यानाचा महत्त्व समजावून सांगितला. त्यांच्या उपदेशांनी अनेक लोकांना आध्यात्मिक शांती मिळवून दिली.

दि 1 जुलै ते 8 जुलै 2025 या कालावधीत पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जात आहे. मठामधे अभिषेक, श्री दासबोध पारायण, भजन, कीर्तन, आरती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि 5 जुलै रोजी श्रीराम महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांचे भजन होणार आहे. रविवार दि 6 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी 9 वाजता परंडा ते डोमगाव पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि 7 जुलै रोजी रात्री 8 वाजता समर्थ भक्त गणेश बुवा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.मंगळवार दि 8 जुलै रोजी सकाळी अभिषेक , भिक्षाफेरी आदी कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर समर्थ भक्त कौस्तुभ बुवा रामदासी मिरज यांचे कीर्तन होणार आहे. गुलाल पुष्पवृष्टी आरती करून पुण्यतिथी उत्सवाची सांगता होणार आहे.या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    error: Content is protected !!