राज्यातीन विना अनुदानित शाळा ८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद..!

परंडा : महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती व शिक्षक समन्वय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी दि. ५ जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी शिक्षक पदवीधर आमदारांच्या शिष्टमंडळास लवकरच बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही या आंदोलनास पाठबळ देण्यासाठी दि.८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. तसेच आझाद मैदानावरील आंदोलनात जिल्ह्यातील सर्व संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळा बंद करून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व आंदोलनाची ताकद वाढवावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य विना अनुदानि शाळा कृती समितीचे लातूर विभागीय अध्यक्ष बिभिषण रोडगे व धाराशिव जिल्हाध्यक्ष नारायण खैरे यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!