परंडा(माझं गांव माझं शहर ) लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, डोमगाव ता. परंडा येथील इयत्ता १० वी. च्या कु. उमेश नवनाथ कदम या विद्यार्थ्याने १७ वर्ष गोळा फेक स्पर्धेत विभागात दुसरा क्रमांक मिळवुन कु. उमेश कदम याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी विद्यार्थ्यांला प्रशिक्षक क्रीडाशिक्षक म्हणून श्री. राजाभाऊ शिंदे सर व श्री. अंगद लांडगे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. श्री. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी कु. उमेश कदम याचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेच्या सचिवा सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी, कल्याणसागर समूहाचे मार्गदर्शक विकास आप्पा कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री. सुबोधासिंह ठाकूर सर, श्री. चंद्रकांत पवार सर, श्री. किरण गरड सर, श्री. समरजीतसिंह ठाकूर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते.