परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा बस स्थानक परिसरात ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने परंडा बस स्थानकाच्या आवारात वृक्ष लागवड करत दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री रमेश परदेशी तसेच माजी नगरसेवक व विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक श्री शब्बीर खान पठाण तसेच प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री किरण शहा एसटी महामंडळाचे सर्व पदाधिकारी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा संघटना उपाध्यक्ष प्रकाश काशीद, गोरख देशमाने, नुरजहा शेख व ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष तनविर पठाण व सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते सर्व मान्यवराचा सत्कार ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने फेटा व पुष्पगुच्छ देऊन मान्यवराचे ऑटो रिक्षा संघटने कडून सत्कार करण्यात आला