समाजसेवक अनिल शिंदे, विजय खरात यांच्या विशेष प्रयत्नातुन ५०० पुरग्रस्त व गरजुना मदत.

अनाळा(प्रतिनिधी पुणे पाणीपुरवठा ठेकेदार संघटनेच्या वतीने परंडा तालुक्यातील विवीध पुरग्रस्त गावातील गरजुना 400 अन्नधान्याच्या किटसह शालेय विद्यार्थ्यांना तीन हजार ड्रेससह ५०० तरुनांना टि शर्टचे वाटप करण्यात आले या बाबत सविस्तर माहिती अशी की पुणे येथील पुणे शहर पाणी पुरवठा संघटनेच्या वतीने नंदकुमार जगताप विजय भाऊ अल्हाट व विक्रमजी पाटुळे यांच्या सहकार्याने व समाजसेवक अनिल भाऊ शिंदे यांच्या प्रयत्नाने हे किट वाटप करण्यात आले हे किट वाटप परंडा तालुक्यातील डोमगाव नालगाव आनाळा कोकरवाडी जवळा अंदोरा तर भुम तालुक्यातील गोरमाळा करमाळा तालुक्यातील पोटेगाव बाळेवाडी या ठिकानी ५०० कुटुंबाना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले तर मलकापुर आनाळा रत्नापुर मुगाव चुंबळी कासारी गोरमाळा भोगलगाव वडगाव या ठिकानी शालेय मुलींना तीन हजार ड्रेस चे वाटप करण्यात आले तर पुणे येथील प्राजक्ता साहु व वरुण साहु यांच्या वतीने पाचशे टि शर्ट वाटप करण्यात आले या वेळी पुणे येथील उद्योजक विक्रम पाटुळे व समाजसेवक अनिल शिंदे विजय भाऊ खरात यांच्या विषेश प्रयत्नातुन या मदतीचे वाटप पुरग्रस्त व गरजुना करण्यात आले हि मदत वाटपासाठी रमेश क्षिरसागर लक्ष्मण क्षिरसागर . शिवाजी क्षिरसागर .केशव पवार .भाऊसाहेब जाधव . प्रशांत शिंदे . संदिप चव्हाण .अमोल रिटे .संदीप थोरात .शिवाजी जाधव .बालाजी शिंदे .अजित क्षीरसागर . वैभव यादव .अनिकेत हिवरे .सोमनाथ कदम सर जेजेराम गिलबिले . शुभम जाधव यांनी परिश्रम घेतले .

error: Content is protected !!