देऊळगांव येथील जि. प. शाळा खैरी नदीच्या महापूरामध्ये बुडाली..!

परंडा(देऊळगाव) परंडा शहर व तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खैरी, नळी, सिना, चांदणी, उल्फा आदीं परंडा तालुक्यातील सर्वच नद्यांना महापूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, मा. आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर साहेबांच्या आदेशानुसार २२ रोजी सकाळी डोंजा, देऊळगांव, जगदाळवाडी, हिंगणगाव, पारेवाडी शिवारातील व नदी काठच्या भागाची आज पाहणी केली, देऊळगांव येथील जि. प. शाळा खैरी नदीच्या महापूरामध्ये बुडाली आहे, नदीकाठच्या लोकांच्या घरात पाणी शिरले आहे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, वस्तीवर जाणारे रस्ते बंद झाले आहेत, यावेळी अनेक नागरिकांशी व्हिडिओ कॉल करुन ठाकूर साहेबांनी संवाद साधत मदत कार्य युद्ध पातळीवर सुरु असेल अश्या कठीण अस्मानी संकटाच्या काळात सरकार आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत असल्याचा विश्वास देवुन धीर देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष सूर्यवंशी उपस्थित होते, यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस श्री. तानाजी पाटील, माजी सरपंच श्री. केशव गाढवे, ॲड. श्री. विवेक काळे, किशोर पाटील, तलाठी श्री. किरण शिंदे, पोलीस पाटील श्री. हाणुमंत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!