खासापुरी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉल‌द्वारे सोडवे~रणजित पाटील

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील खासापुरी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉल‌द्वारे सोडणे बाबतचे चे निवदेन दि ०४/०८/२०२५ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी मा. उपविभागीय अधिकारी ‘ धाराशिव पाटबंधारे उपविभाग क्र ४ परंडा व मा . शाखा अभियंता सिंचन शाखा क्र.१५ परंडा ता. परंडा यांना दिले आहे.
निवदेनात म्हटले आहे की परंडा तालुक्यातील खासापुरी मध्यम प्रकल्प हा यावर्षी शंभर टक्के भरला आहे. मात्र तलावाखालील डावा व उजवा कालवा नादुरुस्त अवस्थेत असून, कालव्यामध्ये काटेरी झाडे व मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. पाटबंधारे विभागाने नादुरुस्त कॅनॉल तातडीने दुरुस्त करून सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉलद्वारे सोडावे.

खासापुरी मध्यम प्रकल्पाच्या कॅनॉलमध्ये काटेरी व कडुनिंबाची झाडे वाढली आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने कॅनॉल पूर्ण झाकला गेला आहे. कॅनॉलच्या उपचाऱ्याही अनेक ठिकाणी बुजल्या असून, त्याही खोदणे आवश्यक झाले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पाऊस झाल्यामुळे तलावात मुबलक प्रमाणात पाणी आले आहे. मात्र सध्या तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तेच पाणी कॅनॉल तातडीने दुरुस्त करून सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉल‌द्वारे सोडावे, अशी मागणी परंडा तालुक्यातील खासापुरी नं.१ व २, रुई, दूधी, खासगाव, सोनगिरी, कात्राबाद येथील शेतकरी वर्गातून केली जात आहे. तरी आपल्या स्तरातून योग्य त्या उपाययोजना करुन खासापुरी मध्यम प्रकल्पातील सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कालव्या‌द्वारे सोडावे. यावेळी सोबत बाजार समिती सभापती जयकुमार जैन , संचालक शंकर जाधव , महादेव गाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!