जवळ(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील जवळा गावामध्ये जिल्हा प्रशासन व उस्फुर्त लोक सहभागातून तसेच हरित धाराशिव अभियानातून जवळा येथे ऑक्सिजन पार्क म्हणून प्राथमिक आरोग्य परिसरात विविध दोनशे प्रकारच्या प्रजातींची लागवड करण्यात सुरुवात झाली आहे.
यामध्ये आंबा,सिताफळ,करंजा,पेरू ,आवळा अशा दोनशे प्रकारच्या प्रजातींचय झाडाची लागवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात करण्यात आली आहे. जवळा ग्रामपंचायत प्रशासनाकडून 6000 झाडे लावण्याचा निश्चय करण्यात आला आहे. प्रत्येक झाडांना क्यू आर कोड लावण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त लोकसहभागातून तसेच जिल्हा प्रशासनाच्या अभियानातून सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, डॉक्टर, अंगणवाडी मदतनीस, आशा, प्राथमिक शाळेतील शिक्षक, वृक्ष प्रेमी यांनी हरित धाराशिव अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद देत झाडे लावण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी संतोष गुळमेरे( ग्रामविकास अधिकारी जवळा नि.), संदीप यादव( सहाय्यक कृषी अधिकारी जवळा नि.), विजय खोसे( ग्राम महसूल अधिकारी जवळा नि.) डॉक्टर मनोहर केंद्रे( वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा नि.) धर्मेंद्र सांगडे, आकाश कोचाळे, प्रकाश कारकर, महादेव वाघमारे उपस्थित होते यावेळी सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थासह वृक्ष प्रेमींनी खड्डे आखणे खड्डे खांदणे , झाडे लावणे, यासाठी परिश्रम घेतले