लोहारा(प्रतिनिधी)जेवळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथील लिंगायत स्मशानभूमीची जमीन अनाधिकृतपणे वृक्षरोपणासाठी म्हाडाला देण्यात आली या विरोधात श्यामसुंदर तोडकरी यांच्या सह सहकार्यांनी अमरून उपोषण सुरू केले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जाहिर पाठिंबा देण्यात आला त्याचबरोबर प्रशासनाला आपली विनंती मान्य करण्यास भाग पाडू असा विश्वास पक्षाच्या वतीने दिला.
जेवळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथील ग्रामपंचायत द्वारे अनधिकृतरित्या लिंगायत स्मशानभूमीची गावठाण मधील जमीन वृक्षरोपणासाठी म्हाडाला हस्तांतरित करण्यात आली आहे ही जमीन गावठाणची असून तिथे लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी ४० आर इतकी जमीन आरक्षित करण्यात आलेली होती येथील लिंगायत समाजाची ५ एकर जागेची मागणी होती ही स्मशानभूमीसाठी आरक्षित केलेली जमीन नेमकी कुठली यावरून वाद निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाच्या वतीने शामसुंदर तोडकरी यांनी सहकाऱ्यांसोबत अमरून उपोषण सुरू केले होते याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने भेट देऊन उपोषण करते शाम सुंदर तोडकरी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली यावेळी ॲड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव,धनंजय सोनटक्के जिल्हा महासचिव,बि.डी.शिंदे,अनुराधा लोखंडे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा,रुक्मिणी आव्हाड महिला आघाडी जिल्हा संघटक,अरुण गरड जिल्हा उपाध्यक्ष,विकास बनसोडे जिल्हा संघटक,नामदेव वाघमारे जीवा सेना जिल्हा अध्यक्ष धाराशिव उपस्थित होते या उपोषण स्थळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधी भेट देऊन आमरण उपोषण जाहीर पाठिंबा देण्यात आला जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,तहसीलदार,गट विकास अधिकारी,मंडल अधिकारी,ग्रामसेवक,तलाठी यांनी या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.