धुळे(माझं गांव माझं शहर ) कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे दि. ०५ सप्टेंबर ” शिक्षक दिनाचे औचित्य साधून सलग तीन दिवस दि. ५,६,७ रोजी शासकीय सुट्ट्या असल्यामुळे दि. ०८ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या आनंदात साजरा केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, तर प्रमुख पाहुणे सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन हे शाळा, शिक्षक शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थ्यांच्या स्नेह सन्मानासाठी आवर्जून उपस्थित होते. सहशालेय सांस्कृतिक समितीचा अतिशय महत्वाचा उत्सव उपक्रम असल्यामुळे मा. मुख्याध्यापक अण्णासाहेब माळी बी. एन. यांनी कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले. सहशालेय सांस्कृतिक समिती प्रमुख कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे व क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी.एस. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यात लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार व श्री. सुनिल ठाकरे यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. काही चुणूकदार उत्सुक विद्यार्थी विद्यार्थिनी मिळून एक दिवस शालेय अध्ययन अध्यापन, व्यवस्थापनाचा कार्यभार सांभाळत अतिशय शिस्तबद्ध शांत वातावरणात शालेय कामकाज हाताळले. विद्यार्थी मुख्याध्यापिका म्हणून इ. १० वी ची विद्यार्थिनी कु. हेमलता सुरेश देसाई, उपमुख्याध्यापिका, कु. निकीता ठाकरे इ. १० वी, पर्यवेक्षिका कु. भुमेश्वरी गायकवाड इ.१० वी तर लिपिक म्हणून कु. शितल बहिरम इ. १० वी, शिक्षिका म्हणून कु. चंचल वसावे इ. १० वी, कु. राशी गावित इ. ८ वी., कु. भाग्यश्री कोरे इ. ९ वी, कु. सलोनी सोनवणे इ. ५ वी, ऋत्विक चौधरी इ. ६ वी, अर्णव चौधरी इ. ५ वी, राज बिऱ्हाडे इ. ५ वी, योगेश गावित इ. ६ वी, शिपाई म्हणून तुषार ठाकरे इ. १० वी,सुमीरन ठाकरे इ. ९ वी या विद्यार्थ्यांनी आपआपल्या भुमिका अतिशय उत्कृष्ट निभावल्या दिवसातील पाच तास अध्यापनासाठी घेण्यात आले. व त्यानंतर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित्त शिक्षक दिनाबाबत सामुदायिक कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनींनी संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, सचिव मा. एकनाथ महाजन, मुख्याध्यापक मा. माळी बी.एन. व सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारींचा, सुंदर स्वागत गीत गायन सादरीकरण करून शाल श्रीफळ व गुलाबी पुष्प देऊन यथोचित सन्मान सत्कार केला. सोबतच कलाध्यापक , कवी/लेखक हिरामण सोनवणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, ” धुळे जिल्हाध्यक्ष ” पदी नियुक्ती झाल्यामुळे संस्थेच्या वतीने व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी विद्यार्थिनींनी सत्कार केला. शालेय कामकाजात सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिवसभरातील कामकाजाचे अनुभव मनोगतातून व्यक्त केले. सोबतच सुंदर शालेय गीतांवर समूहनृत्य सादरीकरण, गीत गायन सादरीकरण करत उपस्थित मान्यवरांचे मन जिंकले. आज खरोखरच विद्यार्थी विद्यार्थिनींनी गुरु प्रेमाची शाळा भरवली असा आनंदमय सूर मान्यवरांच्या प्रतिक्रियेतून उमटला होता. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासाहेब मा. एकनाथ महाजन, क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस., कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आपआपले शालेय जीवनातील अनुभव आणि शिक्षण, शिक्षकाची समाजातील आदर्श तत्वे, महत्व, मूल्य, सुसंस्कार आणि सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक वारसा बाबत मनोगत व्यक्त केले. सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकांमधून आदर्श विद्यार्थी शिक्षक म्हणून ऋत्विक संतोष चौधरी इ. ६ वी याची निवड करण्यात आली. तर आदर्श विद्यार्थिनी शिक्षिका कु. राशी छगन गावित हिची निवड करण्यात आली. व प्रोत्साहन पर सुंदर कृती सादरीकरण करणारे विद्यार्थी राज राजू बिऱ्हाडे इ. ५ वी व कु. हेमलता सुरेश देसाई इ. १० वी. यांची निवड करण्यात आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी उपमुख्याध्यापिका कु.निकीता ठाकरे इ. १० वी हिने केले तर आभार प्रदर्शन कु. भुमेश्वरी गायकवाड इ. १० वी हिने केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना चॉकलेट, अल्पोपहार, मिठाई वाटप करण्यात आली. कार्यक्रम अतिशय सुंदर शिस्तबद्ध यशस्वी झाला.