परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्याचा कना समजला जाणाऱ्या तहसील कार्यालयामधील रेकॉर्ड विभागांमध्ये महसूल विभागाचा भोंगळ कारभार रेकॉर्ड मागणीसाठी अर्ज करून मुदत उलटून गेली तरीही रेकॉर्ड मधली माहिती सापडत नाही , येथील कर्मचारी ताळमेळ नाही , वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात.शेतकर्यांनी मागितलेली माहिती वेळेवर उपलब्ध होत नाहीत. दि.११ रोजी तहसील येथील रेकॉर्ड मध्ये शेतकरी अर्जदार चौकशी ला केले असता तेथील रेकॉर्ड मधील कर्मचारी उत्तरे देतात कर्मचारी रजेवर आहेत. 8 दिवस रजेवर आहेत ? तुम्ही ते आल्यावर या ? अशी देखील माहिती सांगतात. याला सर्वसामान्य नागरिक वैतागून गेले आहेत. यावर परंडा तहसील कार्यालयाचे तहसीलदार निलेश काकडे यांनी ठोस निर्णय घेऊन परंडा तालुक्यातील शेतकरी, दिव्यांग, विद्यार्थी, व इतर नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयी त्वरित दूर कराव्यात. व येथील कारभारावर वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे.अशी मागणी नागरिकाच्या वतीने करण्यात येत आहे.