परंडा (प्रतिनिधी) कुंभेफळ ते परंडा या रस्त्याच्या कडेला वाढलेल्या चिलारी झाडे वाहतुकीस अडथळा ठरणारी धोकादायक होती, त्यानुसार कुंभेफळ गावचे उपसरपंच फारूक शेख यांनी यासंदर्भात ३ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार, परंडा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.
या तक्रारीची तातडीने दखल घेत तहसीलदारांनी उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, परंडा यांना सदर झाडे तात्काळ तोडण्याचे आदेश दिले होते. पावसाळ्यात किंवा वाऱ्यामुळे ही झाडे कोसळून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात होती. तहसीलदारांचे आदेश प्राप्त होताच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही करत रस्त्यावरील अडथळा ठरणारी झाडे तोडून रस्ता मोकळा करण्यात आला .
या कार्यवाही मुळे ग्रामस्थ, वाहनचालक यांनी फारुख शेख यांचे कौतुक केले असून, त्याचबरोबर नागरीकाकडून उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कौतुक होत आहे .