धाराशिव(प्रतिनिधी) ॲड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांचा पदग्रहण सन्मान सोहळा शहर शासकीय विश्राम ग्रह धाराशिव या ठिकाणी दि २१ जुलै रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल , बि.डि.शिंदे माजी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून ॲड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी धनंजय सोनटक्के जिल्हा महासचिव, आर.एस. गायकवाड, अनुराधा लोखंडे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा, सुधीर वाघमारे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन जनरल ट्रान्सपोर्ट कामगार आघाडी,सम्यक विद्यार्थी आंदोलन,भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल त्याचबरोबर रुस्तम खा पठाण,अरुण गरड,मोहनदादा बनसोडे,प्रा.विनोद आंबेवाडीकर,भाऊसाहेब आंदूरकर,नासिर शेख,रविकिरण बनसोडे,शिवाजीराव कांबळे,विकास बनसोडे,परमेश्वर लोखंडे,डॉ.बाळासाहेब चंदनशिवे,तानाजी जाधव,अमोल शेळके,कृष्णा शिनगारे,उमेश कांबळे,महेश गायकवाड जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.महिला आघाडीच्या विद्याताई वाघमारे,मंगलताई आव्हाड,युवक आघाडीचे प्रवक्ते गोविंद भंडारे,जीवन कदम,समता सैनिक दल तथा जीवा संघटना जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे,भारतीय बौद्ध महासभा उमाकांत गायकवाड,भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.अरविंद खांडके सर,मा.जिल्हाध्यक्ष मिलिंद रोकडे,रामभाऊ गायकवाड,रमेश गंगावणे, राहुल पोरे,परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे,धिरज शिंदे,सोमनाथ नागटिळक उपस्थित होते.यावेळी सुधीर वाघमारे,नामदेव वाघमारे,यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रवक्ते गोविंद भंडारी तर आभार प्रदर्शन नासिर शेख यांनी केले