शहरातील हंसराज गणेश मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्यासह हलगीच्या कडकडाटात, लेझीम व बँडपथकासह मोठ्या उत्साहात पार पडली.

परंडा-शहरातील हंसराज गणेश मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्यासह हलगीच्या कडकडाटात, लेझीम व बँडपथकासह मोठ्या उत्साहात शुक्रवारी (दि.५ ) चार वाजता शहरातील मुख्य मार्गावरुन काढण्यात आली भव्य दिव्य मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्याची उधळन करण्यात आली.
शहरातील हंसराज गणेश मंडळाच्या मानाच्या गणपती महाआरती उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख रणजीत पाटील, विश्वजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आली व महिलांनी १००१ मोदकाचा प्रसाद यावेळी वाटप करण्यात आला त्यानंतर श्री ची भव्य विसर्जन मिरवणूक पारंपारिक हलगीपथक, लेझीम पथक बँडपथक,आबदागीरी, घोडे सवाद्यासह भव्य दिव्य अशी श्रीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी गणेश मंडळाचे मार्गदर्शक काकासाहेब सांळुके,अध्यक्ष अमोल जोशी, उपाध्यक्ष वैभव कुळधर्मे, नितीन भोत्रेकर, अँड.श्रीकांत भालेराव मनोज चिंतामणी, चकोर महामुनी अनंत केसकर डॉ.प्रशांत गोफणे,हरीभाऊ जोशी, राहुल देवळे,जयंत भातलवंडे, समर्थ कुळधर्मे, शुभम भातलवंडे, राहुल मुगळीकर संदीप महामुनी, आदीसह मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हंसराज गणेश मंडळाने श्री ची विसर्जन मिरवणूक सुरु होण्यापुर्वी हंसराज स्वामी महाराज यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीस सुरवात करण्यात आली

हंसराज गणेश मंडळाच्या वतीने १० दिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.गणेश मुर्तीचे विसर्जन न करता प्रतिकात्मक मुर्तीचे विसर्जन गेली पाच वर्षापासुन करीत आहेत विसर्जन मिरवणूकीत पारंपारिक वाद्य,बँड पथक हलगी पथक, लेझीम पथकाने नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले होते

Leave a Reply

error: Content is protected !!