सोलापूर जिल्हाचा “आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार” इंद्रजित चंद्रभान मुळीक यांना प्रदान..

करमाळा(प्रतिनिधी) सोलापूर जिल्हाचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे ता-करमाळा जि-सोलापुर येथील क्रीडा शिक्षक इंद्रजित चंद्रभान मुळीक यांना मिळाला आहे. मुळीक यांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात नावारूपाला आणले , तालुका स्तरावर कबड्डी,खो-खो, कुस्ती, लांब उडी, भालाफेक,धावणे,या आशा अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतात. तालुक्यात विद्यालयाचा नावलौकिक करणारे असे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक होय यांनी तालुका स्तर, जिल्हा स्तरावर तसेच राज्य पातळीवर जाऊन त्यांनी धर्मवीर संभाजी विद्यालयाचे नाव उंचावले आहे त्याच्या या कार्याची दखल घेऊन सोलापूर जिल्हा क्रीडा शिक्षक पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुळीक यांचे पंचक्रोशीतील विद्यार्थी, पालक यांचेकडून कौतुक होत आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब नीळ, सचिव हरीदास काळे , जेष्ठ शिक्षक यशवंत कोळेकर ,वैजिनाथ भोईटे, सुखदेव गिलबीले, अशोक जावळे, संतोष पुराने, उत्तम हनपुडे , तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!