परंडा(माझं गांव माझं शहर) जि .प .प्रा .शा .भोंजा हवेली येथे श्रीम ज्योती माळी यांचा निरोप समारंभ संपन्न होताच श्रीम. माळी झाल्या भावुक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, माझ्या सहकाऱ्यांनी, पालक वर्गांनी तसेच गावकऱ्यांनी केलेल्या माझ्या शाळेतील स्वागतामुळे मी अगदी भारावून गेले होते .
खरंतर जेव्हा मी या शाळेत प्रथम आले होते तेव्हा मनात थोडीशी धास्ती होती.विद्यार्थ्यांना मी कितपत आपलीशी वाटेन ? गावकऱ्यांचा मला कसा प्रतिसाद मिळेल?.. माझा स्टाफ कसा असेल ?माझं या शाळेमध्ये कसं होईल ?.. असे एक नवे अनेक प्रश्न सुरुवातीला माझ्या मनात होत . परंतु या शाळेमध्ये आल्यानंतर या शाळेने येथील माझे सहकारी शिक्षक केमदारणे सर, पाटील सर शिक्षक वृंद आदिकराव शेळवणे , मुख्याध्यापक बाळासाहेब घोगरे, पवार सोमनाथ, श्रीम.राऊत मॅडम, नेटके मॅडम ,आमच्या भात वाल्या ताई आणि माझे चिमुकले विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांनी मला कधी आपलंसं केलं मला कळलच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केलं कधीही शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी तत्परता दाखवली. राऊत मॅडम, राऊत मॅडम बद्दल तर काय बोलावे अतिशय शांत, प्रेमळ मनमिळावू सतत प्रत्येक गोष्टीमध्ये होकारार्थी संमती देणाऱ्या मिळून मिसळून वागणाऱ्या लहान भगिनी म्हणजे राऊत मॅडम … नेटके ताई तशा युवा प्रशिक्षणार्थी म्हणून शाळेमध्ये आल्या परंतु त्यांच्याशी बोलल्यावर बसल्यावर असं कधी वाटलंच नाही की त्या गावातील एक नवीन आहेत त्या नेहमी आमच्यापैकीच एक बनवून राहिल्या आमच्या प्रत्येक सुखदुःखात शाळेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून काम केलं सतत काळजी करणाऱ्या तब्येतीच्या चौकशी करणाऱ्या अशा नेटके ताई.आता आमच्या भात वाल्या ताईंचा नंबर त्यांच्याबद्दल काय बोलावे त्यांनी तर मला कधी माहेरची आठवणच होऊ दिली नाही माझी शाळा म्हणजे मला माझं माहेरच वाटायचं भाताला फोडणी दिली की माझ्याकडे यायच्या आपुलकीने चौकशी करायच्या कधी चेहरा सुकलेला वाटला तर का हो मॅडम आजारी आहात का?. काय झालं तब्येतीची काळजी घेत जा असं आपुलकीने विचारपूस करणाऱ्या आमच्या भात वाल्या ताई….शाळेत गेल्यानंतर भोवताली जमा होणारा माझ्या लहानग्या विद्यार्थ्यांचा घोळका.ऑफिस वर्ग उघडण्यासाठी ठरलेले विद्यार्थी शंभू आणि राहुल पळत यायचे चावी मागायचे.. सहावी सातवीच्या मुली पहिली दुसरीचे विद्यार्थी कडेने गलका करायचे …मॅडम तुम्ही आज लवकर आलात? ..तुम्हीच का रोज लवकर येता?… चालत आले तर आज गाडी का नाही आली सोडायला ?असे अनेक प्रश्न विचारायचे.. सकाळचा अर्धा तास म्हणजे माझा या विद्यार्थ्यांसोबत गप्पांची मेजवानीच असायची .
आता राहिले गावकरी पालक वर्ग गावकऱ्यांनी तर मला खूप सहकार्य केलं प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीशी ठाम राहिले केलेल्या कामाचं कौतुक करून सतत प्रेरणा देत राहिले
शेवटी आमचे मुख्याध्यापक घोगरे सरांनीही मला खूप सहकार्य केले . वेळोवेळी मार्गदर्शन व प्रेरणा दिली आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या साह्याने शाळेच्या विकासाचा पाया घोगरे सरांनी पक्का केला. खरंच भोंजाच्या शाळेतील माझी सात वर्ष म्हणजे माझ्यासाठी एक आठवणींचा अमूल्य ठेवा आहे. तो मी मनाच्या एका कोपऱ्यामध्ये सतत जतन करून ठेवीन आज जि. प. प्रा. शा भोंजा हवेली शाळेतील माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी, लाडके विद्यार्थी ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,पालक वर्ग, श्री गणेश बचत गटांच्या सदस्या, माझ्या लाडक्या मैत्रिणी या सर्वांनी मिळून माझ्यासाठी निरोपाचा जो कार्यक्रम आयोजित केला सर्वांनी उपस्थिती दाखवली होती.