परंडा येथील बालवीर गणेश मंडळाची कार्यकारणी जाहीर.

परंडा (प्रतिनिधी) शहरातील सर्वांत जुना देश स्वतंत्र नंतर प्रथमच सन १९५४ साली बालवीर गणेश मंडळाची स्थापना . राजापुरा गल्ली येथे करण्यात आली आज तागायत मंडळाचे अखंडित ७० वर्षापासून दर वर्षी मंडळाचे .गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो दर वर्षी प्रमाणे यंदाही ७१ व्या वर्षी श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

बालवीर गणेश मंडळाची जुनी ओळख म्हणजे परंडा तालुक्यात गणेश उत्सव काळात आकर्षक देखावा व भक्तांना मनोरंजनाचे साधन म्हणून पुर्वी कोल्हापूर येथील नवाजलेला वैभव ऑर्केस्ट्रा दाखवला जात होता. यामुळे अख्या परंडा तालुक्यात परंडा शहरातील राजापुरा गल्ली येथील बालवीर गणेश मंडळ आकर्षक देखावा व ऑर्केस्ट्रा मुळे परंडा तालुक्यात ओळखला जात होता आज हा बालवीर गणेश मंडळ हा ७१ वर्षात पदार्पण करत आहे या ७१ व्या बालवीर गणेश उत्सव मंडळाची बैठक दिनांक १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ९ वाजता श्री भवानी शंकर मंदिरात अयोजीत करण्यात आली या बैठकीत बालवीर गणेश मंडळाला मंडळाचे कायम निमंत्रीत सल्लगार स्वरूपसिंह (पांडु ) ठाकूर यांनी सात फुटी श्री गणेश मुर्ती अर्पण केली या बैठकीत त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेवून या मंडळाची कार्यकारणी निवडण्यात आली या ७१ वर्षाची मंडळाची कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष वेंकटेश दीक्षित उपाध्यक्ष सुरजसिंह ठाकूर खजिनदार राज वळसंगकर पावन मिश्रा सचिव आदर्श सिंह ठाकूर सह सचिव आनंद मोहिते रुषीकेश आगरकर . यावेळी पत्रकार प्रशांत मिश्रा धीरजसिंह ठाकूर दिपकसिंह ठाकूर सारंग ठाकूर समरजितसिंह ठाकूर मदन दीक्षित किशोर महाराज बैरागी . किरण पांडे अमर ठाकूर ओम परदेशी मदन दीक्षित संकेत शुक्ला शंतनु शहापूरे रोहन सुरवसे अनुराग ठाकूर आयुष सद्धीवाल राहुल देशमाने मयुर लोखंडे सुभाष देशमाने कपिल महाराज बैरागी ओंकार तबेलदार भैय्या मोहिते हरिहर दीक्षित अजय पांडे तुषार पांडे वरद वळसंगकर गणेश देशमाने विश्वजीतसिंह ठाकूर शुभम जेधे रक्षितसिंह सद्धीवाल अदि बालवीर गणेशोत्सव मंडळ भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!