डोंजा: (प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसावीवाडी (डोंजा) येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्र भेट म्हणून आज दिनांक 23/12/2025 रोजी भैरवनाथ शुगर वर्कस लिमिटेड सोनारी या साखर कारखान्यात भेट देऊन ऊसापासून प्रत्यक्ष साखर कशी बनते हे अनुभवले,त्यानंतर सोनारी येथील प्रसिद्ध भैरवनाथ मंदिर व मंदिर परिसरातील असणारे माकडे याविषयी माहिती जाणून घेतली.त्यांनतर डोमगाव येथील कल्याण स्वामींचा मठ व मंदिर तसेच मंदिराची शिल्पकला , बांधकाम व ऐतिहासिक महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली त्यानंतर परंडा तालुक्याचे वरदान असणारे सीना कोळेगाव धरण धरणातील पाणी त्या पाण्याचा उपयोग शेती, पिण्यासाठी, औद्योगीकरणासाठी, कसे वापरले जाते याविषयी माहिती देण्यात आली.त्यानंतर परंडा येथील ऐतिहासिक किल्ला दाखवण्यात आला किल्ल्यावर असणारे विविध तोफा, तोफगोळे दरवाजे मंदिरे इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. पुस्तकात वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्षात पाहून विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला होता. अशा पद्धतीने क्षेत्रभेट (सहल) संपन्न झाली या कामी शाळेचे मुख्याध्यापक अनिल गिरी शिक्षिका श्रीमती सविता गिरी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य पालक ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले .