परंडा (प्रतिनिधी) हा जन्म पुन्हा नाही ,गेलेला दिवस, वेळ पुन्हा येणे नाही . सुख – दुःख सतत येत असतात . सुख आलं म्हणून माजायचं नाही आणि दुःख झालं म्हणून खचायचं नाही . जीवन सुखी करण्यासाठी संतांची शिकवण महत्वाची आहे . अनिष्ठ रुढी , परंपरा तथा अंधश्रध्देच्या विरुद्ध पहिले पाऊल श्री संत सावता माळी महाराजांनी टाकले होते
संतांना त्यावेळी अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले, तरीही त्यांनी परमार्थासह समाज कार्य करून समाजाला चांगली दिशा दिली म्हणून ते थोर संत झाले . चांगलं काम केले तर ईश्वर कृपा निश्चित होते . त्यामुळे चांगलं वागणं , बोलन , रहाणं प्रत्येक माणसात असावे . असे प्रतिपादन हभप आण्णासाहेब पाटील महाराज यांनी केले .श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त बुधवार ( दि . २३ ) काशीमबाग येथील श्री संत सावता माळी मंदिर येथे किर्तन , पूजा ,आरती आदि धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले व महाप्रसाद वाटप
करण्यात आले .
यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते . यावेळी हभप काकासाहेब गवारे ,अंकुश जमदाडे , भारत देवकर , बळीराम कोळी, माणिक चोबे, माजी नगरसेवक संजय घाडगे ,भिमराव भानवसे ,बापू भानवसे ,अशोक भानवसे ,रमेश घाडगे , हनुमंत घाडगे , उमेश घाडगे ,नितिन भानवसे, महेश भानवसे , धनंजय भानवसे, दत्ता भानवसे , प्रकाश माळी , , जोतीराम भानवसे , प्रभू भानवसे , संभाजी भानवसे ,कल्याण भानवसे , किसन भानवसे, सुर्यभान भानवसे ,मच्छींद्र भानवसे , निवृत्ती भानवसे , लक्ष्मण भानवसे , कल्याण घाडगे , रामेश्वर भानवसे , गणेश भानवसे , योगेश भानवसे आदि उपस्थित होते. रोहित भानवसे ,वैष्णव घाडगे, अभिजित भागडे , दादा भानवसे , श्रेयस भानवसे , बाळू भानवसे , समर्थ भानवसे , विलास भानवसे, पवन भानवसे , अनिकेत भानवसे , प्रतिक भानवसे , सोहम भानवसे, कृष्णा भानवसे , वैभव भानवसे , आदित्य भानवसे , समाधान घाडगे आदिनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .