परंडा (प्रतिनिधी) तालुक्यात दोन दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे साकत धरण व खासापुरी धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे अनेक खेडेगावाचा संपर्क तुटला आहे. परंडा तालुक्यातील बावची रोडवरील फुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्याचबरोबर ते पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वाहून जाते सध्या बार्शी परांडा रोडवरील सोनगिरी पुलावरून देखील पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत आहे. सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रवास करताना हे दोन्ही मार्ग सध्या स्थितीमध्ये बंद आहेत पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर सुरळीत चालू होतील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे . करमाळा, परंडा येथील वाहन चालक यांना व प्रवाशांना अडचण निर्माण होत आहे. तरी या दोन्ही पुलावर प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करून प्रवाशांना पाण्यातून प्रवास करून देऊ नये जीवित हानी होऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे
तालुक्यातील सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक खेडेगाव तालुक्याच्या ठिकाणी जोडली जातात ते सध्या ठप्प झाले आहेत त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी पाण्यातून प्रवाह करू नये तसेच आपल्या जीविकास धोका निर्माण होईल असे देखील करू नये काळजी घ्या सुरक्षित रहा. प्रशासनात सहकार्य करा