अनाळा येथील भाजपाच्या जनता दरबारास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद..

परंडा:- भारतीय जनता पार्टी च्या वतीने जनता दरबार@२ नागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील अनाळा जिल्हा परिषद गटात अनाळा येथे ग्राम पंचायत सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी १८९ लेखी तक्रारींची दखल घेतली तर काही तक्रारींची भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करीत तक्रारींचा निपटारा करण्यात आला. जनता दरबार चालू असताना ऐनवेळी अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार श्री. निलेश काकडे व तालुका कृषी अधिकारी श्री. नानासाहेब लांडगे यांनी जनता दरबारास भेट दिली यावेळी महसूल व कृषी विभागाच्या तक्रारींचे मोठ्या प्रमाणावर निराकरण झाले. या जनता दरबारात येणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी भाजपा च्या वतीने प्रत्येक विभागांचे‌ २ प्रमुख नेमण्यात आले असून लवकरच दखल तक्रारी मार्गी लागणार आहेत. या आयोजित जनता दरबारात भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब, तालुकाध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जेष्ठ नेते अर्जूनबापु शिंदे, ता. उपाध्यक्ष हरी शिंदे, निशीकांत क्षिरसागर, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, ता. चिटणीस जोतीराम गिरवले, अनाळा गावचे सरपंच जोतीराम आबा क्षिरसागर, उपसरपंच दादा फराटे, बिभीषण आप्पा शिंदे, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, तुकाराम हजारे, दत्ता ठाकरे, श्रीमंत शेळके, बाबासाहेब जाधव, सारंग घोगरे, श्रीराम देवकर, अर्जुन कोलते, जयंत सायकर, योगेश डांगे, स्वामी ढवाण, राहुल खोत, पांडुरंग मुसळे, सिध्दीक हन्नुरे, व्यंकटेश दिक्षित, कार्तीक दिक्षित तसेच मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!