परंडा(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी, परंडा तालुक्याच्या वतीने ‘अटल संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजपा ताकदीने लढवणार असुन प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातुन इच्छुक उमेदवारांकडून परिचय पत्र भरण्यात येणार आहेत. भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संघटनात्मक बांधणी करुन येणाऱ्या निवडणुकीत भाजप मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, ॲड. जहीर चौधरी, श्री. सुखदेव टोंपे, श्री. ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, श्री. तानाजी पाटील, श्री. अर्जुनबापु शिंदे, श्री. राजाभाऊ चौधरी तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.