परंडा(परंडा)ध्येय निश्चितीनंतर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन माजी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग डॉ. संजय जहागिरदार यांनी केले.
कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथे दिनांक १२ रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्टीय युवा दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटनिदेशक फत्तेसिंग जगताप हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून माजी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग डॉ. संजय जहागिरदार हे होते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की तुमची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या आयुष्यातील प्रगतीवर लक्ष्य केंद्रित करावे आणि आपले ध्येय साध्य करावे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पनिदेशक कल्लेश भोसले यांनी तर आभार प्रदर्शन शुभम पाटील यांनी मानले हा कार्यक्रम पार पडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य केशव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशक फत्तेसिंग जगताप, शिल्पनिदेशक रतीकांत पवार, नितेश फाळके, रामेश्वर जाधवर शिल्पनिदेशिका महानंदा काळे, भाग्यश्री मोहरे, सुरेखा जाधव, वरिष्ठ लिपीक सुनील सोमवंशी , कनिष्ठ लिपीक प्रद्युम्न डाळिंबकर यांच्या सह चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.