परंडा दि.१० (प्रतिनिधी) – संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांनी आकर्षक मार्च पासपासून ते शिस्तबद्ध संचलनाद्वारे उत्कृष्ट संघभावना प्रदर्शित केली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे रा.गे. शिंदे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य चंद्रकांत घुमरे, माजी क्रीडा शिक्षक शिवाजी कदम, अड.संतोष सूर्यवंशी, धीरज ठाकूर, दिव्यांग संघटना अध्यक्ष तानाजी घोडके, निशा सोनवणे, मेजर सतीश शिंदे, वाहिद सौदागर, सचिन सोनारीकर, अनुराग ठाकूर, प्रवीण चौतमहाल, साबेर शिकलकर, प्राचार्य संतोष भांडवलकर इ.हस्ते झाले. खेळ हा व्यक्तिमत्त्व विकासाचा अविभाज्य भाग असून, तो शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित करतो. असे मत माजी प्राचार्य चंद्रकांत घुमरे सर यांनी व्यक्त केले. रेस, स्लो सायकलिंग, फ्रॉग जंप, थ्री लेग रनींग, रिले, म्युजिकल चेअर, गोळफेक लेमन अँड स्पून,इ वैयक्तिक तर रस्सी – खेच, व्हॉलिबॉल, खो-खो, कबड्डी, क्रिकेट इ सांघिक आदी विविध खेळांचा समावेश असून विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. खेळाच्या मैदानावर या स्पर्धांमध्ये धावण्याची शर्यत, उंची उडी, बलून- ब्लास्ट, बनाना रेस, पोटॅटो विद्यार्थ्यांचा जोश आणि प्रेक्षकांचा उत्साह पाहून परिसर दुमदुमून गेला होता. शाळेचे प्राचार्य, शिक्षकवर्ग, कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा पुढील आठ दिवस चालणार असून विजेत्यांना समारोप समारंभात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन क्रीडा विभाग प्रमुख सुमित कोकाटे, सुमय्या शेख, अश्विनी बामनकर, करिष्मा तुटके व मुस्कान तांबोळी करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी नांगरे यांनी केले तर सर्व शिक्षक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.