परंडा(प्रतिनिधी)-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पक्ष कार्यालयामध्ये रिपाइं आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे फकिरा दल संघटनेचे प्रमुख सतीश कसबे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन देवकते यांच्या शुभहस्ते दि १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मा. तालुकाध्यक्ष फकीर सुरवसे , उत्तम ओव्हाळ, दादासरवदे, सोशल मीडिया आय टी आय टी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, तालुका उपाध्यक्ष जयराम साळवे, माजी सरपंच दीपक ठोसर, सजीवन भोसले, कैलास शिंदे, गणेश रन दिल, लाला भालेराव, बाबासाहेब गायकवाड, बापु हावळे,पोपट ओव्हाळ, भीमराव भोसले, विकास गोमासे, फुलचंद ओव्हाळ, धनंजय यशवद, हो रे, हनुमंत कांबळे, बाप्पा चौधरी, रामा दाभाडे, लाला हावळे, दादा सावंत, जितेंद्र सावंत, भीमराव सावंत, खंडू चाबुकस्वार, दशरथ हावळे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.