परंडा नगरपालिका उपनगराध्यक्षपदी जनशक्ती आघाडीच्या ठाकूर यांची निवड होते;स्वीकृत नगरसेवकपदी कुरेशी, दखनी..

परंडा, दि. १४(तानाजी घोडके) परंडा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी जनशक्ती नगरविकास आघाडीचे समरजितसिंह ठाकूर यांची निवड झाली. तर स्वीकृत नगरसेवकपदी जनशक्ती नगर विकास आघाडीचे इस्माईल कुरेशी आणि शिवसेना शिंदे पक्षाचे वाजीद दखनी यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे जाकीर सौदागर निवडून आले आहे त्यांचे आठ नगरसेवक निवडून आले तर जनशक्ती नगरविकास आघाडीचे बारा नगरसेवक निवडून आलेले आहेत.
दोन्ही गटाकडून संख्याबळावर प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक होणार हे निश्चित होते. उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी जनशक्ती नगरविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचा उपनगराध्यक्ष होणार हे देखील निश्चित होते. बुधवारी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी पहिली बैठक पीठासीन अधिकारी जाकीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ले, अधीक्षक जगदिश सोंडगे, मते तर मन्नाबी मतीन जिनेरी यांना ९ मुनीर जिकरे हे होते.
बैठकीत उपनगराध्यक्षपदासाठी जनशक्ती नगरविकास आघाडीकडून समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर यांचा अर्ज आला तर शिवसेनेकडून मन्नाबी मतीन जिनेरी यांनी अर्ज दाखल केला. यात समरजितसिंह ठाकूर यांना १२ मते पडली. यात समरजितसिंह ठाकूर निवडून आले आहे. तर स्वीकृत नगरसेवकपदी जनशक्ती नगर विकास आघाडीचे इस्माईल कुरेशी, शिवसेना शिंदे पक्षाचे वाजीद दखनी यांची निवड करण्यात आली.

यावेळी निवडून आलेले सर्व सदस्य उपस्थित आघाडीच्या समर्थकांनी समोर जेसीबीच्या सहायाने फुलाची व गुलालाची उधळण करून मोठा जल्लोष केला. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, माजी नगरसेवक सुबोधसिंह ठाकूर उपस्थित होते.

error: Content is protected !!