बावची विद्यालय व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न.

परंडा (माझं गांव माझं शहर) येथील बावची विद्यालय व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या निर्देशानुसार दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. शासनाने शाळा व महाविद्यालय स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मेळावे आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या असून, त्याच अनुषंगाने या मेळाव्याचे आयोजन…

अधिक बातमी वाचा...

कुभेफळ येथे राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी

परंडा :(माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील कुभेफळ येथील ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच व ग्रामस्थांच्या वतीने ‘स्वराज्य जननी’ राजमाता जिजाऊ यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील मान्यवर, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित वक्त्यांनी…

अधिक बातमी वाचा...

भाजपाचे युवा नेते श्री. मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट!

परंडा(प्रतिनिधी) भाजपाचे युवा नेते श्री. मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन भाजपा नेते, धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार केला. तर याप्रसंगी त्यांचाही सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा परंडा तालुका अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ॲड. श्री….

अधिक बातमी वाचा...

महावितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान..

परंडा(प्रतिनिधी) परांडा तालुक्यातील भोंजा हवेली येथील शेतकरी गणपती दगडू कांबीलकर यांच्या शेतातील विजेच्या तारेला तार चिटकून शॉट सर्किट ने ५ एकर ऊसा सोबत शेतातील पी व्ही सी पाईप बोअर वायर आदि शेती साहित्य आगीमध्ये खाक झाले असून एकीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान तर त्यातील बचावातील पिक देखील आगीतून पार जळाले असून तब्बल ५ ते ७ लाखांचे…

अधिक बातमी वाचा...

नुतन भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रियंका क्षिरसागर यांचा ; युवा प्रतिष्ठाण अनिल शिंदे मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार…

आनाळा-( प्रतीनिधी) भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या परंडा तालुका अध्यक्षपदी सौ प्रियंका निशीकांत क्षिरसागर यांची निवड झाल्याबद्दल आनाळा येथील युवा प्रतिष्ठाण अनिल शिंदे मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आनाळा ता परंडा येथील जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापक सचिवा सौ प्रियंका निशीकांत क्षिरसागर यांची नुकतीच परंडा तालुका भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली…

अधिक बातमी वाचा...

पूरग्रस्त देवगाव (खु.) येथे आरोग्य पथकातर्फे ग्रामस्थांची तपासणी व औषधोपचार

परंडा (माझं गांव माझं शहर) देवगाव (खु.) येथे उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आसू प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नळगाव उपकेंद्राच्या आरोग्य पथकाने गावात वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित केले. या शिबिरामध्ये गावातील पूरग्रस्त आणि गरजू व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना जागेवरच आवश्यक औषधोपचार देण्यात आले. गावात पुराचे पाणी शिरल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही…

अधिक बातमी वाचा...

उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा मराठवाडा रत्न पुरस्कार जाहीर .

परंडा दि १४ (माझं गांव माझं शहर) : – परंडा – पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा ” मराठवाडा रत्न ” पुरस्कार जाहिर झाला आहे . मराठवाडा सेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे च्या वतीने दिला जाणारा पुरस्कार मराठवाडा मुक्ती दिन दि १७ सप्टेबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे…

अधिक बातमी वाचा...

धाराशिवकरांनी ” पुढच्या वर्षी लवकर या ” च्या जयघोषात गणरायाला निरोप दिला.

धाराशिव (माझं गांव माझं शहर ) मागील 10 दिवस लाडक्या श्री गणेशाच्या आगमनामुळे घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात उत्साहाचे , आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील सार्वजनिक मंडळांनी व घरोघरी देखील शहरवासियांनी विविध प्रकारे श्री गणरायासमोर विविध देखावे सादर करून तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या जल्लोषात गणेश उत्सव साजरा केला. शनिवारी…

अधिक बातमी वाचा...

शहरातील हंसराज गणेश मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्यासह हलगीच्या कडकडाटात, लेझीम व बँडपथकासह मोठ्या उत्साहात पार पडली.

परंडा-शहरातील हंसराज गणेश मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्यासह हलगीच्या कडकडाटात, लेझीम व बँडपथकासह मोठ्या उत्साहात शुक्रवारी (दि.५ ) चार वाजता शहरातील मुख्य मार्गावरुन काढण्यात आली भव्य दिव्य मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्याची उधळन करण्यात आली. शहरातील हंसराज गणेश मंडळाच्या मानाच्या गणपती महाआरती उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख रणजीत पाटील, विश्वजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आली…

अधिक बातमी वाचा...

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या अनुषगांने परंडा पोलिसांच्या वतीने शांतता समिती बैठक , शहरात रूट मार्च.

परंडा(माझं गांव माझं शहर) शहरात आगामी काळात होणारे सन उस्तवा निमित मा.पोलीस अधिक्षक धाराशिव शफकत आमना, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले यांचे उपस्थितीत दिनांक २३.०८.२०२५ रोजी पोलीस ठाणे परंडा येथे गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या अनुषगांने शांतता समिती बैठक, पोलस पाटील व गणेश मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांचे बैठकीचे आयोजन करण्यात…

अधिक बातमी वाचा...

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे शहर युवा सहसचिव पदी शुभम मुळे यांची निवड

पुणे(माझं गांव माझं शहर)अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे शहर युवा सहसचिव पदी शुभम मुळे यांची नुकतीच निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे येथील राज्यस्तरीय राजकुमार काळभोर स्मृती राज्यस्तरीय कवी व साहित्य संमेलनात या निवडीबद्दल दिनांक. १९ ऑगस्ट रोजी महात्मा जोतिबा फुले सभागृहात शुभम मुळे यांचा सत्कार करण्यात आला. समारंभात संमेलन अध्यक्ष,…

अधिक बातमी वाचा...

ठाणे :- समाज कल्याण विभागांतर्गंत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू.

ठाणे (प्रतिनिधी) समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद ठाणे यांचाया वतीने-५% दिव्यांग कल्याण सेस व २०%जिल्हा परिषद सेस अंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व मागासवर्गीय(SC/ST/NT) लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दि:-३१-ऑगस्ट २०२५-पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून, लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://zpthaneschemes.com-या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!