रक्षा विसर्जन करून नाही तर वृक्ष रोपनातून जपणार आईच्या स्मृती .
कंडारी (प्रतिनिधी) -दि ६ आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तिच्या रक्षा व अस्थि तिर्थक्षेत्री किंवा नदीत विसर्जन न करता त्या व्यक्तीने आयुष्यभर कष्ट केलेल्या शेतात टाकून त्यावर वृक्षारोपण करणे म्हणजे त्या व्यक्तीबरोबर निसर्गाप्रती देखील कृतज्ञता व्यक्त करणे होय. हा आदर्श मोरे परिवाराने जपला आहे. परंडा तालुक्यातील कंडारी येथील साळूबाई रघुनाथ मोरे यांचे दि ४ रोजी अल्पशा आजाराने…