आठवडी व दैनंदिन बाजार ठेक्यावर देण्यास मंजुरी; परंडा नगर परिषदेच्या बैठकीत निर्णय.

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा नगरपरिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत आठवडी व दैनंदिन बाजार ठेक्यावर देण्यास मंजुरी देण्यात आली. परंडा नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या या सभेला मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली, अधीक्षक जगदीश सोंडगे, मुनीर जिकरे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय…

अधिक बातमी वाचा...

रोजगार मेळावा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवीन संधी, नवी स्वप्ने आणि नवे भविष्य घडवणारा – डॉ सतीश कदम

प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर) परंडा येथे आयोजित केलेला दि.१३ रोजी रोजगार मेळावा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवीन संधी, नवी स्वप्ने आणि नवे भविष्य घडवणारा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार डॉ सतीश कदम यांनी महाविद्यालयात उद्घाटन प्रसंगी केले. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा.जि.धाराशिव येथे कौशल्य रोजगार उद्योजकता…

अधिक बातमी वाचा...

५ वर्षीय जारा शाहरुख मुलानीचा पहिला रोजा; आलेश्वर परिसरात कौतुक!

परंडा (प्रतिनिधी) पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लीम बांधवांकडून सध्या कडक उपवास (रोजा) पाळले जात आहेत. कडक ऊन आणि वाढता उन्हाचा तडाखा असतानाही, परंडा तालुक्यातील आलिश्वर येथील अवघ्या ५ वर्षांच्या चिमुरडीने, जारा शाहरुख मुलानी हिने आपला आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.जाराने पहाटे ‘सहेरी’ करून दिवसभर अन्न-पाण्याविना राहून आपला पहिला उपवास पूर्ण केला. सायंकाळी ‘इफ्तार’च्या वेळी…

अधिक बातमी वाचा...

करोडो खर्चून उभं केलेलं मेडिकल कॉलेज; पण रुग्णांना सोलापूरला धाडायचं? — मनोज जाधव यांचा संतप्त सवाल

धाराशिव | धाराशिव जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्यसेवेच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. “करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला काय चाटायचं का?” असा संतप्त सवाल रुग्णसेवक मनोज जाधव यांनी आरोग्य विभागाला केला आहे. मनोज जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील कल्पना इंगळे यांना गर्भाशयाच्या पिशवीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी धाराशिव वैद्यकीय…

अधिक बातमी वाचा...

स्वयंम शिक्षण प्रयोग एलआयसी व एच एफ एल यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा येथे महिला मेळावा संपन्न .

परंडा दि . 10 – जागतिक महिला दिनानिमित्त परंडा येथे स्वयंम शिक्षण प्रयोग व एलआयसी एच एफ एल प्रकल्प अंतर्गत दि . १० रोजी एमटेक सभागृहात महिला मेळावा संपन्न झाला . प्रारंभी सावित्रीबाई फुले व स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या संस्थापिका प्रेमागोपालन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बक्षीस वितरण

, परंडा(MY VILLAGE MY CITY )बावची विद्यालय, परंडा . या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर विविध मॉडेल्स व प्रयोग सादर करून आपली वैज्ञानिक दृष्टीकोन व कल्पकता दाखवून दिली. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे…

अधिक बातमी वाचा...

बांधकाम विभागाचा भोगळं कारभार चिंच विक्रीत मोठा गैरप्रकार? – लिलाव न करता शासकीय मालमत्ता विक्रीचा आरोप; चौकशीची मागणी

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) परंडा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात मोठ्या गैरप्रकाराचा आरोप समोर आला असून परंडा येथे सार्वजनिक बाधकाम विभाग यांच्या क्वार्टर आवारामध्ये चिंचाच्या दहा ते 12 झाडे असलेल्या चिंचेच्या फळांची अधिकृत लिलाव न करता परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी परंडा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय भानुदास मेहेर यांनी…

अधिक बातमी वाचा...

स्मार्ट मीटर व वाढीव वीजबिलाविरोधात बार्शीतील आंदोलनाला शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा

माझं गांव माझं शहर : बार्शी, स्मार्ट मीटर बसविणे व वाढीव वीजबिलांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या संदर्भात आंदोलनकर्ते अमोल डोंगरे व प्रमोद कसबे यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांना समर्थन देत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महावितरण, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) बार्शी शहर कार्यालय येथे देण्यात…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसील कार्यालयासमोर कंडारी येथील राजेंद्र पाटील यांचे आमरण उपोषण; पाचव्या दिवशीही प्रशासन खडबडून जागे .

परंडा (प्रतिनिधी): येथील रहिवासी राजेंद्र उत्रेश्वर पाटील यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात परंडा तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरू आस्ताना धक्कादायक बाब म्हणजे, उपोषणकर्त्याची प्रकृती बिगडल्यामुळे परंडा उप रुग्नालयचे .डॉ पठान यांनी कर्मचारी सोबत घेऊन उपोषन कार्यकर्ताची तपासणीकेली त्या तपासनी करून ब्टेटमेंट चालू करू असे सांगितले . अद्याप प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची…

अधिक बातमी वाचा...

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा मौजे आसू येथे संपन्न

परंडा(माझं गांव माझं शहर ) छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा मौजे आसू येथे दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी शुभारंभ. या शिबिरासाठी भूमउपविभागीय अधिकारी मा.रेवया डोंगरे परंडा तहसीलदार निलेश काकडे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून महसूल विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी महिला महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांची निराकरण व…

अधिक बातमी वाचा...

परंडा पंचायत समितीच्या सभापती पदी अर्चना जाधव यांची निवड ; उपसभापती पदी गवारे

परंडा :परंडा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम दि. ०६ रोजी पार पडला यावेळी सकाळी सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव यांच्या पत्नी अर्चना जाधव यांनी व राष्ट्रवादी काँगेसच्या मोनिका पाटील यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला तर उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे परशू…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग उद्योग समूह , महाराष्ट्र राज्य आयोजित ग्रामीण रुग्णालय परांडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न.

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांगाना प्रमाणपत्र मिळावे , दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबावी, दिव्यांग सेवा तालुक्यात मिळाव्यात या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूह या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून परंडा शहर व तालुक्यातील दिव्यांग तपासणी शिबिर दिव्यांग अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.त्या अनुषंगाने आज दिनांक 6 मार्च 2026 वार शुक्रवार परंडा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!