अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा प्रदेश उपाध्यक्षपदी तुकाराम गंगावणे निवड.
परंडा(प्रतिनिधी) येथील साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले तुकाराम दासराव गंगावणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक जाणीवा, ग्रामीण साहित्य चळवळीतले योगदान, तसेच वंचित, उपेक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या कार्याची दखल घेत परिषदेकडून ही निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर…