‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी!
मुंबई(प्रतिनिधी) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी)वर आयोजित विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला दिलेल्या राज्य महोत्सवाच्या दर्ज्यानुसार, या वर्षीचा उत्सव मुंबईत अभूतपूर्व जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात चौपाटीवरील वातावरण भारावून गेले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील दहा दिवसांचा गणेशोत्सव…