परंडा येथे महात्मा बसवेश्वर यांची ८९४ वी जयंती उत्साहात साजरी
माझं गाव माझं शहर | परंडा : येथील परंडकर महाराज मठामध्ये परंपरेनुसार जगत् ज्योती, थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांची ८९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात वीरशैव लिंगायत संघटनेचे माजी अध्यक्ष सुहास मस्के यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रतिमेस पुष्पहार…
