माझं गाव माझं शहर | परंडा : येथील परंडकर महाराज मठामध्ये परंपरेनुसार जगत् ज्योती, थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांची ८९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात वीरशैव लिंगायत संघटनेचे माजी अध्यक्ष सुहास मस्के यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अरुण कानडे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांवर प्रकाश टाकत समाजात समानता, बंधुता आणि कर्मप्रधान जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी बसवेश्वरांनी दिलेल्या सामाजिक संदेशाचे आजच्या काळातही महत्त्व असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास मधू लोखंडे, राजेंद्र कुळधर्मे, सुधीर मस्के, शंकर तबेलदार, मंगेश लोखंडे, शांतीलाल शहापुरे, बापू मुळे, अनंत लोखंडे, महालिंग तबेलदार, संतोष गवंडी, सुभाष देशमाने, वैभव विभुते, आकाश राशिनकर, नागेश कानडे, विश्वास गुडे, वेदांत लोखंडे, अमर गाढवे, विश्वेश लोखंडे, कृष्णा विजापूरे, बप्पा बकाल, साईराज कानडे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी झाले होते. उपस्थितांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे आचरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
