परंडा- शहरातील विठ्ठल मंदीरात संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
परंडा(माझं गांव माझं शहर) सालाबादाप्रमाणे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार ता.२० रोजी येथील विठ्ठल मंदीर, कुराड गल्ली येथे नाभिक समाजाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.संत सेना पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. परंडा भजनी मंडळाचा भजनाचा,गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पुजन नाभिक संघटनेचे युवा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष नागेश काशीद,शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील…