शेतकऱ्यांची थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्या समोर करणार आंदोलन| महाराष्ट्र राज्य साखर आयुक्ताचे कार्यालयाला पत्र

Img 20250723 wa0039

परंडा(प्रतिनिधी) पुणे येथे महाराष्ट्र राज्य साखर आयुक्ताच्या कार्यालयात मा. जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी शेतकऱ्याच्या घामाचे पैशाची कारखान्याकडे थकलेली रक्कम असून आज पर्यंत दिले नाहीत यामुळे शेतकऱ्यांसाठी मा. रणजीत दादा पाटील यांनी (दि.२३जुलै) रोजी साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ  यांची भेट घेऊन सांगितले की भैरवनाथ शुगर संचलित तेरणा सहकारी साखर कारखाना ढोकी व भैरवनाथ शुगर संचलित शिवशक्ती सहकारी साखर कारखाना वाशी व भैरवनाथ शुगर वर्क सोनारी असे ३ कारखान्याची शेतकऱ्याची थकबाकी एकूण ०८ कोटी १६ लाख रुपये आणखी दिलेली नाही.

   त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्याचे हाल होत आहेत तरी आपण लवकरात लवकर गोरगरीब शेतकऱ्यांचे थकित रक्कम आहे. ती देण्यात यावी अन्यथा सात दिवसानंतर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे सांगितले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जैन मालक शिवसेना शहर प्रमुख रईस भाई मुजावर संचालक शंकर जाधव भालचंद्र पाटील इ पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!