चर्मकार समाजाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात यशस्वी बैठक संपन्न!

मुंबई(प्रतिनिधी )चर्मकार समाजातील नागरिकांच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन अत्यंत सकारात्मक असून, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी चर्मकार समाजाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत दिली.
या बैठकीस माजी खासदार राहुल शेवाळे, समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, बार्टी चे महासंचालक सुनील वारे, तसेच चर्मकार ऐक्य परिषदेचे अध्यक्ष संजय खामकर सुभाष मराठे पूजा कांबळे अनिल निर्मळे राजेश साबळे धनराज खिराडे अण्णासाहेब खैरे अशोक खैरे यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत खालील महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली

असे अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली असून सर्व प्रश्न व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासन पुढील कारवाई करून समाजाला न्याय देण्याचे बैठकीत आश्वासन देण्यात आले वरील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्मकार ऐक्य परिषद शासनाकडे पुढील काळात पाठपुरावा करून समाजाचे प्रश्न सोडवणार आहे

Leave a Reply

error: Content is protected !!