डोंजा जिल्हा परिषद गटात जनतेचा उमेदवार म्हणून हरीचंद्र ( बापू ) मिस्कीन यांची जोरदार मागणी.

परंडा (तानाजी घोडके) तालुक्यातील डोंजा सिनाकोळेगाव धरण क्षेत्रातील विकास कामांपासून ते ग्रामपातळीवरील जनतेच्या अडीअडचणींपर्यंत नेहमीच सक्रिय राहून लोकसेवेची परंपरा जपणारे हरीचंद्र (बापू ) महादेवराव मिस्कीन हे नाव आज डोंजा जिल्हा परिषद गटात जनतेच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
कोळेगाव-सिना धरणाच्यावेळी त्यांचे वडील महादेव आप्पा मिस्कीन सरपंच पदावर असताना त्यांनी धरणग्रस्त गावांचे पुनर्वसन, सोयीसुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्या घरगुती परंपरेतच वाढलेल्या हरीचंद्र बापूंनी बालवयापासून समाजकार्याचा ध्यास घेतला.
धरणग्रस्त गावांमध्ये आजही अनेक समस्या कायम असल्या तरी त्या सोडविण्यासाठी हरीचंद्र बापूंनी *मा. आमदार राहूल मोटे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. डोमगाव, सोनारी, डोंजा, भोंजा, कुंभेजा, रोसा, कौडगाव, आ- लेश्वर अशा अनेक गावांतील रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज आणि शैक्षणिक सुविधांवर त्यांनी बापूराव मनापासून लक्ष केंद्रित केले आहे.दलित वस्त्यांतील नागरिक असोत वा सर्वसामान्य शेतकरी प्रत्येक घटकाच्या प्रश्नांना हात घालून त्यांचे निराकरण करण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. ग्रामपंचायत, जिल्हा मजूर फेडरेशन तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकहिताचे उपक्रम राबवले आहेत. गावातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी हरीचंद्र ( बापू ) यांनी तलाव विकासासारख्या प्रकल्पांद्वारे प्रशासकीय कामेही त्यांनी यशस्वीपणे पूर्ण करून घेतली आहेत.
डोंजा जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आहे की, हरीचंद्र (बापू) मिस्कीन यांना उमेदवारी मिळाल्यास नक्कीच या गटातील विकासकामांना वेग येईल आणि राहूल मोटे तसेच अजित पवार यांची ताकदही अधिक बळकट होईल. गावोगावी सुरू असलेल्या स्थानिक चर्चांमधून एकच आवाज डोंजा जिल्हा परिषद गटाचा भावी सदस्य – हरीचंद्र ( बापू ) महादेवराव मिस्कीन !

error: Content is protected !!